इर्शाळवाडीतील मावशीच्या कृतीनं डोळ्यांतच पाणी आलं;मृत गायीच्या पायाशी माथा ठेवून ढसाढसा रडल्या

इर्शाळवाडीतील मावशीच्या कृतीनं डोळ्यांतच पाणी आलं;मृत गायीच्या पायाशी माथा ठेवून ढसाढसा रडल्या

पुणे

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत अनेकांनी आपली जिवाभावाची माणसं गमावली आहे. पण या दुर्घटनेत फक्त जीवितहानीच नाही, तर अनेक पशुंचाही मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत राघी पारखी या मावशींच्या गायीचा मृत्यू झाला आहे.

ही मृत गाय तिथेच पडून असताना या मावशीने त्या गायीचे दर्शन घेतलं आहे. याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गायीला हिंदू धर्मात माता मानतात. अनेकजण पशूंना आपल्या कुटुंबातीलच एक सदस्य मानतात, मायेनं जिवाभावाची त्यांचं सारं काही करतात.

उदरनिर्वाहासाठीही यांचा वापर केला जातो. त्यांचं असं निघून जाण्याचं दुःख हे जवळची व्यक्ती निघून जाण्या इतकंच असतं. व्हायरल फोटोत या मावशींनी केलेल्या कृत्याने प्रत्येकाचं मन हेलावून गेलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *