मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा पुरंदर दौरा रद्द;कोट्यवधी रुपये पाण्यात;विजय शिवतारे यांची मात्र पंचायत,खर्च कोणाकडून वसुल करणार?,तालुक्यात रंगली चर्चा

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा पुरंदर दौरा रद्द;कोट्यवधी रुपये पाण्यात;विजय शिवतारे यांची मात्र पंचायत,खर्च कोणाकडून वसुल करणार?,तालुक्यात रंगली चर्चा

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे 13 जुलैला मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ व जेजुरी विकास आराखडा भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते परंतु अपरिहार्य कारणामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या असणारे दौरे रद्द करण्यात आले आहेत.

 या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार होते. तर मोठ्या प्रमाणावर मंडप व इतर सुविधा ची जय्यत तयारी करण्यात आली होती सदरच्या कार्यक्रमावर  दीड ते दोन कोटी रुपयांचा खर्च आला होता. त्यामुळे प्रशासनाचे दोन कोटी रुपये पाण्यात गेल्याचेही स्पष्ट झाले आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या खर्चास जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे

त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केला होते. तर शासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली होती त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांना विदाऊट युनिफॉर्म हजर राहण्याचे देखील आदेश देण्यात आले असल्याची चर्चा सध्या होत आहे.

पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे हा कार्यक्रम ३ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवार यांनी पदाचा राजीनामा देत राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परिणामी ३ जुलैऐवजी ८ जुलै ही तारीख मंत्रालयातून जिल्हा प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी ही तारीखही रद्द करत १३ जुलै ही नवी तारीख कार्यक्रमासाठी देण्यात आली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्यांदा आपला पुरंदर दौरा रद्द केल्यामुळे माजी राज्य मंत्री विजय शिवतारे यांची मात्र पुरती फजिती उडाली आहे. तर शासनाकडून मोठ्या प्रमाणावर मंडप व इतर साधनांसाठी देखील खर्च करण्यात आला होता हा खर्च कोणाकडून वसूल केला जाणार याची देखील चर्चा सध्या तालुक्यात रंगत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *