नायगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भारती चौंडकर यांची बिनविरोध निवड

नायगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भारती चौंडकर यांची बिनविरोध निवड

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक सोमवार दि.२२ रोजी ग्रामपंचायत कार्यालय नायगाव येथे पार पडली. माजी सरपंच बाळासाहेब कड यांनी राजीनामा दिल्याने सरपंच पदाची जागा रिक्त असल्याने ही निवडणूक घेण्यात आली, या निवडणुकीत सौ. भारती मंगेश चौंडकर यांची बिनविरोध निवड झाली.

एकूण नऊ ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतच्या ५ वर्षे कार्यकालामध्ये सलग तिसऱ्यांदा सरपंच पदाची निवड बिनविरोध पार पडली.

या निवडणुकीचे कामकाज पुरंदर तालुका तहसील विभागातील मंडलाधिकारी भिसे यांनी पाहिले. सरपंच पदी सौ.भारती चौंडकर यांची निवड झाल्यानंतर गावातील नागरिकांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.

ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मा.ग्रामपंचायत सदस्य संजय होले, दिलीप मोरे,मा.सरपंच दत्तात्रय कड,बाळासाहेब शेंडगे,स्वप्नील पाटोळे, मा.सरपंच बाळासाहेब कड,पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष सदानाना खेसे,त्र्यंबक चौंडकर, मा ग्रामपंचायत सदस्य नानासो कड, मा.उपसरपंच किशोर खळदकर, मा.उपसरपंच अनिल शेंडगे,मल्हारी कड,प्रदीप खेसे,यशवतराव कड,नामदेव शेंडगे,रामदास कड, गणेश चौंडकर,अजित मेमाणे, राहुल कड, सचिन होले,महेश कड,महादेव खेसे, अशोक होले,विकास फडतरे, सुरज कड आदी मान्यवरांनी प्रयत्न केले.

सरपंच पदी निवड झाल्यानंतर गावातील विकासकामांना प्राधान्य देत गावचा एकोपा जोपासून कामकाज केले जाईल अशी प्रतिक्रिया नवनियुक्त सरपंच सौ.भारती चौंडकर यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *