दिवे घाटात भीषण अपघात!!!!टँकरची दुचाकीला धडक; दोन ठार,दोन जखमी

दिवे घाटात भीषण अपघात!!!!टँकरची दुचाकीला धडक; दोन ठार,दोन जखमी

पुरंदर

पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील दिवेघाटात टँकर ने दुचाकी ला धडा दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. सोमवारी रात्री आठ वाजून पंचवीस मिनिटांनी हा अपघात झाला असून लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरचा टँकर हा सासवडकडुन पुण्याकडे निघाला होता.

टँकर चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने दुचाकीला धडक देत 200 ते 300 फूट दरीत कोसळला.अपघात इतका भीषण होता की पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *