पुणे जिल्ह्यातील “या” गावातील घटना ! गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात चक्क बैलाची उपस्थिती;बैलापुढेच थीरकली गौतमी

पुणे जिल्ह्यातील “या” गावातील घटना ! गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात चक्क बैलाची उपस्थिती;बैलापुढेच थीरकली गौतमी

पुणे

“सबसे कातिल गौतमी पाटील’ हे वाक्य आता सगळीकडेच ऐकायला मिळत आहे. आपल्या दिलखेच अदा आणि नृत्याविष्काराच्या माध्यमातून गौतमी पाटील ने अवघ्या महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावलं आहे. सध्या सगळीकडे चर्चा होते ती म्हणजे फक्त गौतमी पाटीलची.

सोशल मीडियावर देखील गौतमी पाटील धुमाकूळ घालत असते. सध्या महाराष्ट्रातल्या फक्त शहरांमध्येच नाही तर खेडोपाड्यामध्ये गौतमी पाटीलचे कार्यक्रम होतात. हिच गौतमी पाटील आपल्या तालावर सर्वांना नाचवायची एकही संधी सोडत नाही.

गौतमीची क्रेझ ऐवढी वाढली आहे की अगदी कोणाचे लग्न असो, हदळ असो, वा वाढदिवस असो गौतमीला बोलावलेच जाते. नुकताच गौतमी पाटीलचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

आतापर्यंत गौतमीच्या कार्यक्रमाला तरुणांपासून वोयवृद्धांपर्यंत सर्वांनी तुफान गर्दी केल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण गौतमीच्या कार्यक्रमात बैलांनी उपस्थिती लावली असे सांगितल्यावर तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसला असेल ना.

तर हे खरं आहे पुण्यामध्ये गौतमी पाटीलचा एक कार्यक्रम झाला याला चक्क बैलांनी हजेरी लावली होती. या बैलांच्यासमोच गौतमीने ठुमके लावले. तिचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहेपुणे जिल्ह्यातल्या मुळशीतील एका राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित मांडव टिळा कार्यक्रमात गौतमी पाटीलला बोलवण्यात आले होते.

या कार्यक्रमात चक्क बैलासमोर गौतमी पाटील नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमासाठी भलामोठा स्टेज बांधण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या ठिकाणी बावऱ्या नावाचा बैल गौतमीच्या स्टेजच्या समोर बांधला होता. या बैलांच्या समोर गौतमी पाटीलने जबरदस्त नृत्य सादर केले.

गौतमी पाटीलचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्यासंख्येने लोकांनी उपस्थिती लावली. मुळशीतील सुशील हगवणे युवा मंच बावऱ्या फॅन्स क्लबने हा कार्यक्रम आयोजित केला होता. सध्या या कार्यक्रमाची चर्चा सगळीकडेच सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *