कोण रोहित पवार? काय त्यांची पात्रता? बोलण्याच्या पात्रतेचा तो माणूस नाही;”या” मंत्र्यानी केला जोरदार हल्लाबोल

कोण रोहित पवार? काय त्यांची पात्रता? बोलण्याच्या पात्रतेचा तो माणूस नाही;”या” मंत्र्यानी केला जोरदार हल्लाबोल

पुणे

भाजप नेते, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ही सावरकर गौरव यात्रा आहे. कोण रोहित पवार?.. काय त्यांची पात्रता आहे, अशा शब्दात रवींद्र चव्हाण यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

गांधी हा एक विचार आहे, तो विचार संपवण्याचा एका मोठ्या राजकीय पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळं हिंमत असेल तर, भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा त्यांनी अधिकृत भूमिका घेण्याचं धाडस दाखवावं, असं आवाहन रोहित पवार यांनी भाजपला केलं होतं.

रोहित पवार यांच्या आवाहनावर बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. ‘राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ही सावरकर गौरव यात्रा आहे. कोण रोहित पवार ? काय त्यांची पात्रता आहे? असा सवाल करत चव्हाण टीकास्त्र सोडलं.

रोहित पवार यांच्याबद्दल काय बोलायला पाहिजे. बोलण्याच्या पात्रतेचा तो माणूस नाही. ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकर कळत नाही, त्याला बोलण्याचा काहीच अधिकार नाही, अशीही टीका चव्हाण यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *