खळबळजनक!! पुरंदर मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स कं. लिलावात;सभासदांचा जीव टांगणीला

खळबळजनक!! पुरंदर मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स कं. लिलावात;सभासदांचा जीव टांगणीला

   आमदार संजय जगताप यांच्याशी संबंधित पुरंदर मिल्क अँड अग्रो लिमिटेड कंपनी संचालित खळद ता. पुरंदर येथील आनंदी डेअरी एका सहकारी बँकेने अखेर लिलावात काढली आहे. याबाबतचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्स वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर पुरंदर तालुक्यात खळबळ उडाली असून येथे सभासद असलेल्या अनेक शेतकऱ्यांचा जीव त्यामुळे टांगणीला लागला आहे. 

 या प्रकल्पासाठी कंपनीने घेतलेले कर्ज न फेडल्याने बँकेने जप्तीची कारवाई ०५ डिसेंबर २०२२ रोजी केली होती. आता थेट लिलाव प्रक्रिया बँकेने सुरू केली असून या लिलावातून कर्जाची थकीत १५ कोटी ०१ लाख ४१ हजार ८०० रुपये एवढी रक्कम वसूल केली जाणार आहे. 

  लिलावासाठी १९ एप्रिल २०२३ पर्यंत बोली लावण्याची मुदत आहे. लिलावासाठी उपलब्ध मालमत्तेचा तपशील पुढीलप्रमाणे:

१) मौजे. खळद येथील गट न ८९७ मधील १ हेक्टर ९३ आर जमीन
२) या जमिनीवर असलेला डेअरी प्रोजेक्ट व त्या अनुषंगाने केलेले सर्व बांधकाम
३) प्रकल्पाची संपूर्ण मशिनरी, गेस्ट रूम, वजनयंत्रणा व शेड.

कोल्ड स्टोरेज सुद्धा लिलाव प्रक्रियेत
लिलावात काढलेल्या मालमत्तेत या ठिकाणी असलेल्या कोल्ड स्टोरेजचा सुद्धा समावेश आहे. त्यासाठी ४७ लाख ६२ हजार इतकी किंमत निर्धारित करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *