PUNE BREAKING!!!!!प्रतिष्ठित कंपनीत नोकरी, चांगला पगार,तरी आनंद मिळत नाही;२७ वर्षांच्या इंजिनियरची अकराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

PUNE BREAKING!!!!!प्रतिष्ठित कंपनीत नोकरी, चांगला पगार,तरी आनंद मिळत नाही;२७ वर्षांच्या इंजिनियरची अकराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

पुणे

पुण्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. चांगल्या कंपनीत, चांगल्या पगाराची नोकरी असूनही मला आनंद मिळतं नाही, म्हणून एका तरुणाने इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंडवडमधील चिखली परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये आज सकाळी आठ वाजता दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे.

विरेन जाधव असं आत्महत्या केलेल्या 27 वर्षाच्या अभियंता तरुणाचे नाव आहे.वीरेन जाधव हा टाटा मोटर्समध्ये इंजिनियर ह्या पदावर कार्यरत होता. मूळचा नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेला विरेन जाधव हा चिखली परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये आपल्या आईसोबत सध्या राहत होता.वीरेन जाधव याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या नोटबुक मध्ये आपल्या आत्महत्या करण्याबद्दलचे कारण लिहून ठेवला आहे.

मला चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी आहेत तरी मला आनंद मिळत नाही, असं लिहून वीरेन जाधव यांनी आपलं जीवन संपवला आहे.विरेन जाधव यांच्या मृत्यू संदर्भात सध्या चिखली पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीरेन जाधव हा मानसिक दृष्ट्या थोडा अस्वस्थ असावा, त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्यासारखा टोकाचा पाऊल उचलला असावा, अशी प्राथमिक माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *