पुरंदर
पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावात रेल्वे रुळालगत एक अनोळखी मृत व्यक्ती आढळून आला असून मंगळवारी सकाळी हा मृतदेह रेल्वे कर्मचाऱ्यांना दिसला रात्री रेल्वेची धडक बसून हा व्यक्ती मृत्युमुखी पडला आहे का धावत्या गाडीतून पडून हा व्यक्ति मृत पावला आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे का अपघात याबाबत उलट सुलट चर्चा वाल्हे परिसरात होत आहे.
मंगळवारी सकाळी महर्षी वाल्मिकी विद्यालय समोरील रस्त्याच्या पलीकडे रेल्वे रुळालागत एक साठ वर्षे व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीच्या अंगावर पांढरा शर्ट पायजमा गांधी टोपी गळ्यात लाल गोप असलेला पहराव
आहे.
ही आत्महत्या आहे की अपघात हे पोलीस शोधत असून परिसरातील कोणाचा परिवारातील व्यक्ती घर सोडून गेले असल्यास त्यांनी जेजुरी पोलीस स्टेशन संपर्क करावा असे आव्हान पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.