धक्कादायक !!!!!                                 पीएमपी बसमध्ये चोरी, “या” गावातील महिलेच्या पर्समधले दागिने चोरट्यांनी लांबविले

धक्कादायक !!!!! पीएमपी बसमध्ये चोरी, “या” गावातील महिलेच्या पर्समधले दागिने चोरट्यांनी लांबविले

पुणे

 पीएमपी बसमधून एका महिला प्रवाशाच्या पर्समधून चोरट्यांनी सुमारे एक लाख ६५ हजार रुपयांचे दागिने लांबवल्याची घटना घडली आहे. कात्रज ते गाडीतळ हडपसर प्रवासादरम्यान रविवारी हा प्रकार घडला असून याबाबत हडपसर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, शेवाळवाडी (ता. हवेली) येथील महिला पीएमपी बसने कात्रज येथून हडपसरकडे या मार्गावर प्रवास करीत होती.

यावेळी प्रवासादरम्यान रस्त्यात बसचा सीएनजी संपला. ज्यामुळे बस थांबल्याने काही प्रवासी खाली उतरले. त्यावेळी ही महिलाही बसमधून खाली उतरली. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने या महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने लंपास केले.

चोरी झाल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेने पोलिसांत धाव घेतली असून फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा सखोल तपास हडपसर पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *