खळबळजनक!!!                                  आर्थिक देवाण-घेवाणीतून शिक्षकानेच शिक्षकाचा डोक्यात दगड घालून केला खून

खळबळजनक!!! आर्थिक देवाण-घेवाणीतून शिक्षकानेच शिक्षकाचा डोक्यात दगड घालून केला खून

उस्मानाबाद

उस्मानाबाद शहरातील कुरणे नगर भागात एका शिक्षकाने दुसर्‍या शिक्षकाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. आर्थिक देवाण घेवाण मधुन डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना समोर आली आहे. मित्र व सहकारी असलेल्या या दोन्ही शिक्षकांमध्ये वाद झाला. त्यानंतर हा वाद इतका विकोपाला गेला की एका शिक्षकाने दुसर्‍या शिक्षकाचा खून केला.

शहरातील भोसले हायस्कूल येथे असलेल्या शामराव देशमुख या शिक्षकाच्या डोक्यात आरोपी शिक्षक धीरज हुंबे यांनी दगड घालून खून केला. दरम्यान या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरुद्ध उस्मानाबाद शहर पोलिसात कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *