खळबळजनक !!!!!!                            सहलीला गेलेल्या चौथी ते सहावीच्या तब्बल ८८ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

खळबळजनक !!!!!! सहलीला गेलेल्या चौथी ते सहावीच्या तब्बल ८८ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

पुणे

अमरावतीहून शिर्डी जिल्ह्यात आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. या घटनेतील 88 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.अमरावती येथून चौथी ते सहावीच्या 230 विद्यार्थ्यांची सहल आयाेजित करण्यात आली हाेती. ही सहल नेवासा येथे पाेहचले. रात्री सहलीमधील विद्यार्थ्यांसाठी जेवण तयार करण्यात आले.विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर त्यांना उलटी आणि मळमळीचा त्रास सुरु झाला.

काहींनी जेवणातून विषबाधा झाली असावी असा अंदाज बांधला. त्यानंतर तातडीने 88 विद्यार्थ्यांना शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.डाॅ. प्रितम वडगावे यांनी सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. ते म्हणाले रात्री अकरा वाजता रूग्णालयात विद्यार्थ्यांना आणण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. धाेका टळला असला तरी या घटनेतील बाधितांवर लक्ष ठेवून आहाेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *