चिंचवड विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का,बड्या नेत्याने दिला राजीनामा;राष्ट्रवादीत करणार प्रवेश?

चिंचवड विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का,बड्या नेत्याने दिला राजीनामा;राष्ट्रवादीत करणार प्रवेश?

पुणे

सध्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे मैदानात उतरले आहेत. निवडणुकीत आपलाच उमेदवार निवडून यावा,यासाठी दोन्ही पक्षांकडून रणनिती आखण्यात येत आहे. अशातच पोटनिवडणुकीपूर्वी भाजपला एक मोठा धक्का बसला आहे.

पिंपरी निलख परिसरातील भारतीय जनता पक्षाचे युवा नगरसेवक तुषार कामटे यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावर कामटे यांनी राजीनामा दिल्याने भाजपचं टेन्शन वाढलं आहे. विशेष बाब म्हणजे, गेल्या वर्षी तुषार कामटे यांनी आपल्या नगरसेवक पदाची कारकीर्द पूर्ण होण्याअगोदरच नगरसेवक पदाचा मुदतपूर्व राजीनामा दिला होता.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप करत असलेला भ्रष्टाचाराला कंटाळून मी माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा देत आहे,असा आरोप तुषार कामटे यांनी केला होता. आता त्यांनी थेट भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, तुषार कामटे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *