वाह गं सुनबाई!                                           पुणे जिल्ह्यातील “या” गावात सासुच्या व स्वतः च्या अंगावरील सोने चोरी प्रकरणात सुनच निघाली मुख्य सुत्रधार

वाह गं सुनबाई! पुणे जिल्ह्यातील “या” गावात सासुच्या व स्वतः च्या अंगावरील सोने चोरी प्रकरणात सुनच निघाली मुख्य सुत्रधार

पुणे

घरात घुसून तोंडावर टॉवेल गुंडाळून हातातील सोन्याच्या बांगड्या व सुनेच्या गळ्यातील गंठण जबरदस्तीने चोरून नेल्या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पाेलिसांनी संशयितांना अटक केली आहे.हा प्रकार २ फेब्रुवारी रोजी मिठानगर येथे घडला होता. या गुन्ह्याचा तपास करताना फिर्यादी यांची सुनच गुन्ह्याची मुख्य सुत्रधार निघाली. पोलिसांनी सुनेसह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.

कासीम बुरानसाब नाईकवाडी (वय-21 रा. जेवरगी झोपडपट्टी, ता. जेवरगी, जि. गुलबर्गा, कर्नाटक), मेहबुबसाब अब्दुलसाब बदरजे (वय-25 रा. निलकोड ता. जेवरगी, जि. गुलबर्गा, कर्नाटक), अब्दूल दस्तगीर मुल्ला (वय-19 रा. गाव येड्रामी आंबेडकर चौक ता. येड्रामी, जि. गुलबर्गा, कर्नाटक) आणि 30 वर्षीय सुनेला पोलिसांनी अटक केली आहे.याप्रकरणी संशयित आरोपी सुनेच्या सासूने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *