अवघडच !              भर दिवसा सात बायकांनी मिळून युवकालाच पळवलं

अवघडच ! भर दिवसा सात बायकांनी मिळून युवकालाच पळवलं

सोलापूर

सोलापूरात सात महिलांनी एका युवकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. भर दिवसा युवकाला दुकानातून फिल्मी स्टाईलने मारहाण करत अपहरणाचा प्रयत्न केला गेला. सर्व महिलांवर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सोलापुरातील रंगभवन चौक परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला.

आकाश काळे हा व्यवसायाने ठेकेदार असलेला युवकाला दुपारी दोनच्या सुमारास दुकानातून मारहाण करत गाडीत घालून पळविण्यात आले.

आकाशच्या मित्रांनी त्या वाहनाचा पाठलाग केला. त्यानंतर अपहरण कर्त्यांची गाडी अडवली. त्यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. हा गाेंधळ सुरु असताना घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आणि आकाशचा अपहरणाचा प्रयत्न फसला.आकाश याच्या अपहरण प्रकरणी सात महिला आणि एका पुरुषावर पाेलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधव रेड्डी (सहाय्यक पोलीस आयुक्त) म्हणाल्या संबंधित अपहरण करता महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *