खळबळजनक!आमदार फंडातून ग्रामपंचायतची कामे;४० सरपंच व ठेकेदार ACB च्या रडारवर!!!!!         ACB च्या सूत्रधारांना आमदारांचा इशारा

खळबळजनक!आमदार फंडातून ग्रामपंचायतची कामे;४० सरपंच व ठेकेदार ACB च्या रडारवर!!!!! ACB च्या सूत्रधारांना आमदारांचा इशारा

पुणे

माझ्या आमदार फंडातून ग्रामपंचायतींनी कामे केली. त्या त्या ग्रामपंचायतींना एसीबीकडून नोटीसा दिल्या जात आहेत. त्यातून माझ्यावर दबाव आणण्याचा ते वेळोवेळी प्रयत्न करताहेत. मात्र या एसीबीच्या चौकशीच्या पाठीमागे जे कोणी सुत्रधार असतील त्यांना एकच सांगतो,अशा चौकशीच्या दबावाला घाबरून आम्ही बळी पडणार नाही. शिवसेनेचे काम आम्ही अधिक जाेमाने करु.

आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघातील भरणी कुडाळ येथील सरपंच यांना रत्नागिरी लाचलुचपत विभागाने नोटीस पाठवली आहे. तसेच त्यांच्या मतदारसंघातील सुमारे चाळीस सरपंच आणि ठेकेदार एसीबीच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.

दरम्यान आमदार वैभव नाईक म्हणाले माझ्यावर दबाव आणण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला जात आहे. मात्र अशा चौकशीच्या दबावाला घाबरून आम्ही पळ काढणारे नाही. आता आगामी काळात शिवसेनेचे काम आम्ही अधिक जोमाने करू. दरम्यान यापुढच्या काळात अशा अनेक चौकशा आम्ही सुद्धा करू शकतो येवढं विरोधकांनी लक्षात ठेवाव असा इशारा वैभव नाईक यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *