पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना !!!!! पैशावरुन वाद,डोक्यात रॉड घालून मित्रानेच मित्राला संपवले

पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना !!!!! पैशावरुन वाद,डोक्यात रॉड घालून मित्रानेच मित्राला संपवले

पुणे

पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. कोयता गॅंगच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण सुरू असताना पैशाच्या वादामुळे मित्राच्या डोक्यात रॉड घालून हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की,पैश्यावरून मित्राचा रॉड डोक्यात घालून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हल्लीत आंबेगावमध्ये ही घटना घडली आहे. राहुल दांगड असे या खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून सुशांत आरुडे असे आरोपीचे नाव आहे.

दरम्यान, या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *