पुण्यातील खळबळजनक प्रकार !!!!!                    “सेक्स करा आणि पैसे कमवा” महिलेच्या फोननंतर पुढे काय झालं…..

पुण्यातील खळबळजनक प्रकार !!!!! “सेक्स करा आणि पैसे कमवा” महिलेच्या फोननंतर पुढे काय झालं…..

पुणे

फोनची रिंग वाजली…फोन उचल्यावर समोर महिला होती…ती सुंदर आवाजात म्हणाली की जर तुम्हाला श्रीमंत महिलेसोबत सेक्स करायचं आहे का? एवढंच नाही तर यासाठी तुम्हाला पैसे मिळणार…अरे देवा ही कुठली ऑफर? हा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडला आहे. पुण्यातील शिवाजीनगर भागातील महिलेला फोन आला आणि मग शहरात एकच खळबळ उडाली. 

शहरात गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतं आहे. अशात हाय प्रोफाईल महिलांसोबत सेक्स करा आणि पैसेही कमवा, या फोननंतर सायबर पोलिसांची झोप उडाली आहे. शुक्रवारी फिर्यादी यांच्या मोबाईल फोनवर अनोळखी क्रमांकावरुन फोन आला.

फोन उचल्यावर समोरची व्यक्ती म्हणाली की, ‘आम्हाला तुम्हाला घरकाम किंवा काही रोजगार द्यायचा आहे. आम्ही तुम्हाला समाजातील उच्च आणि श्रीमंत महिलांची ओळख करुन देऊ. तुम्हाला त्या महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत.त्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतील.’ या ऑफरनंतर महिलेच्या पायाखालची जमीन सरकली.
महिलेने ताबडतोब सदर घटनची तक्रार पोलिसांकडे केली.पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी अज्ञात महिलांवर 509, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *