खळबळजनक!!!!पुरंदर तालुक्यातील “या” गावातून छातीला कोयता लावून चौघांनी नेली स्वीफ्ट कार पळवून

खळबळजनक!!!!पुरंदर तालुक्यातील “या” गावातून छातीला कोयता लावून चौघांनी नेली स्वीफ्ट कार पळवून

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील बोरावके मळा या ठिकाणी चौघांनी गाडीत बळजबरी प्रवेश करीत छातीला कोयता लावून धमकावत्याचा प्रकार घडला आहे. 2,00,000/-रु. ची एक स्वीफ्ट कार रजि. नं MH12LP6165 मारुती सुझुकी कंपनीची राखाडी रंगांची व रोख रक्कम 500/- रुपये याप्रमाणे एकुण 200500/- एवढा मुद्देमाल चोंघा अज्ञात इसमांनी लंपास केला आहे.


सदर घटनेची सविस्तर हकीगत अशी की दि. 10/12/2022 रोजी सायं 7/30वा.चे सुमारास बोरावके मळा सासवड ता.पुरंदर जि.पुणे येथे चार अनोळखी इसम जबरदस्तीने माझे गाडीत बसले. माझे छातीवर कोयता लावुन जीवे मारण्याची धमकी दिली. मला गुंजखेडा ता. बारामती जि.पुणे या ठिकाणी सोडले. माझे खिशातील 500रु. व माझी स्वीफ्ट कार रजि.नं MH12LP6165 असा एकुण 2,00,500/- रु.ची कार व रोख रक्कम जबरीने घेवुन गेले म्हणुन माझी त्या अनोळखी इसमांविरुध्द फिर्याद आहे. मी त्या लोकांना पुन्हा पाहील्यास ओळखु शकतो असे दिलिप काशिनाथ शिर्के यांनी फिर्याद दाखल करताना सांगितले.


पुढील तपास पोलिस निरिक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महांगडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *