पुरंदर तालुका समन्वयक पदी सौरभ कुंजीर

पुरंदर तालुका समन्वयक पदी सौरभ कुंजीर

पुरंदर

सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र च्या पुरंदर तालुका समन्वयक पदी नुकतीच वाघापुर गावचे उपसरपंच सौरभ कुंजीर यांची निवड करण्यात आली. या निवडीचे नुकतेच त्यांना पत्र देण्यात आले.

सक्षम ग्रामपंचायत व सन्मानित सरपंच यासाठी कार्यरत असलेल्या सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांनी उपसरपंच सौरभ कुंजीर यांना वाघापुर गावासाठी केलेल्या उत्कृष्ठ कामगीरीच्या जोरावर राज्य कार्यकारिणीने पुरंदर तालुका समन्वयक पदी निवड केल्याचे पत्र सरपंच परिषद मुंबई,महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी दिले.

एक उच्चशिक्षीत कर्तृत्ववान असुन समाजाप्रति असणारी तळमळ व सर्वसामान्य माणसाशी त्यांची कायमच नाळ जोडलेली आहे.

येणार्या काळात सरपंच परिषदेच्या ध्येयधोरणानुसार कार्यरत राहुन परिषदेत सक्रिय योगदान देण्यात येईल असे सौरभ कुंजीर यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *