सातारा
लोणंद या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या महाराष्ट्राचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच भाजपचा केंद्रीय प्रवक्ता चतुरवेदी यांच्या विरोधात लोणंद मराठा समाज मंडळाच्या वतीने जाहीर निषेध करून नगराध्यक्षांना निवेदन देण्यात आले.
त्याप्रसंगी लोणंद चे नगराध्यक्षा मधुमती पलंगे गालींदे,उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके पाटील,डॉक्टर नितीन सावंत,सुनील यादव,संतोष सस्ते,सुभाष दादा घाडगे,दादा इंदलकर,रोहित निंबाळकर,राजू शेठ डोईफोडे,सागर शेळके,गणीभाई कच्ची,बाळासाहेब कदम,सागर गालींदे,इत्यादी असंख्य शिवप्रेमी मराठा समाज मंडळाचे तसेच लोणंद नागरिक उपस्थित होते.