पुरंदर तालुक्यातील अजब घटना !!!!     “या” गावात घरगुती वादातून बायकोने नवर्याच्या डोक्यात घातला फराळाचाच डबा

पुरंदर तालुक्यातील अजब घटना !!!! “या” गावात घरगुती वादातून बायकोने नवर्याच्या डोक्यात घातला फराळाचाच डबा

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एक व्यक्तीने त्याला बायकोने मारहाण केल्याबाबत फिर्याद दिली आहे.या बाबत पोलिसांनी भरतीत दंड विधान कलम 324 नुसार महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.यांप्रकरणी सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की याबाबतची फिर्याद सासवड येथे राहणारे रघुनाथ मोहनराव जगताप यांनी दिलीय.जगताप यांना यापूर्वीच अर्धांग वायूचा झटका येऊन गेलाय.त्यामुळे त्यांना नोकरी नाही.

त्यांनी राहते घर विकून छोटे घर घेऊन उरलेले पैसे बँकेत ठेऊन येणाऱ्या व्याजाच्या पैशात गुजराण करायचे ठरवले होते.यावरून नवरा बायको मध्ये सतत वाद होत होते त्यांचा हा निर्णय त्यांच्या पत्नीला मान्य नव्हता.यातून दोघांची सतत भांडणे होत होती काल रविवारी त्यांच्या दोघात या वरुन पुन्हा भांडण झाले.

त्यांनी तिला नेहमी प्रमाणे समजावुन सागंण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या बायकोने फराळाने भरलेला स्टिलचा डबा जगताप यांच्या डाव्याबाजुच्या कानाच्या वरडोक्यात जोरात मारला त्यावेळी त्यांच्या डोक्यातुन रक्त आले.याबाबतची फिर्याद जगताप यांनी दिली आहे.याबाबतची फिर्याद काल दिनांक ०६/११/२०२२ रोजी रात्री साडे आकरा वाजता सासवड पोलिसात देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *