पुरंदरच्या शिरपेचात मानाचा तुरा !!!! मराठवाडा कृषी विद्यापिठाच्या कार्यकारी परिषदेवर “या” जगतापांची निवड

पुरंदरच्या शिरपेचात मानाचा तुरा !!!! मराठवाडा कृषी विद्यापिठाच्या कार्यकारी परिषदेवर “या” जगतापांची निवड

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड येथील सुरज जगताप यांची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या शिफारसिने, कृषी मंत्री अब्दुलजी सत्तार साहेब यांच्या मान्यतेने व महाराष्ट्राचे जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्रि विजय बाप्पू शिवतारे साहेब यांच्या पाठपुराव्याने सुरज उत्तम जगताप यांची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर नेमणूक करण्यात आली .

सुरज उत्तम जगताप हे मा. राज्यमंत्रि विजय बाप्पू शिवतारे यांचे विश्वासू असून ते युवासेना शिंदे गटामध्ये कार्यरत आहेत.
जगताप हे कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी असून विद्यापीठातील शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी काम करायचा त्यांचा मानस आहे. तसेच ते बॉक्सिंग, व्हॉलीबॉल,फूटबॉल या खेळामध्ये ते राष्ट्रीय खेळाडू आहेत.

नेमणूक झाल्यानिमित्त जगताप यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, कृषीमंत्री अब्दुलजी सत्तार साहेब यांचे आभार मानले तसेच ज्यांच्या पाठिंब्यामुळे हे पद मिळाले ते म्हणजे मा. मंत्री जलसंपदा व जलसंधारण ना. विजय बाप्पू शिवतारे साहेब यांचे विशेष आभार मानून बाप्पू काही करू शकतात हे उद्गार जगताप यांनी काढले.

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नुकतेच त्यांना महाराष्ट्र शासन सहसचिव यांच्या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

सुरज जगताप हे उच्चविद्याविभुषीत असुन त्याचा शेती या निषयात सखोल अभ्यास आहे. त्यांच्या निवडीमुळे पुरंदर तालुक्यातील शेतकरी व तरुणांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *