चंद्रशेखर बावनकुळे यांना हॉस्पिटलमध्ये उपचाराची गरज ; त्यांना राष्ट्रवादीच्या विरोधात सातत्याने झटके येतात

चंद्रशेखर बावनकुळे यांना हॉस्पिटलमध्ये उपचाराची गरज ; त्यांना राष्ट्रवादीच्या विरोधात सातत्याने झटके येतात

पुणे

खेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांनी आज भाजपात प्रवेश केला. यावेळी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बंद पाडू, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. बारामतीनंतर खेड आळंदीही आमच्या टार्गेटवर असल्याचं ते म्हणाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे म्हणाल्या, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना तातडीने कुणीतरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन जावे.

त्यांना राष्ट्रवादीच्या विरोधात सातत्याने झटके येत असतात.राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांची थेट भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यावर टीका केली. त्यांना सातत्यानं झटके येत आहे. घड्याळ बंद पाडू. महाविकास आघाडीला उमेदवार भेटणार नाही. हे त्यांचं लक्षण झटक्याचं आहे.

त्यामुळं त्वरित उपचार करणं गरजेचं आहे, असं ठोंबरे म्हणाल्या.राज्यात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. शेतकऱ्यांना लवकर मदत पोहचली पाहिजे. अन्नधान्याची दिवाळीच्या मुहूर्ताची कीट त्यांना मिळाली पाहिजे. असे प्रश्न न सोडविता सातत्यानं त्यांना जे झटके येतात.

त्यासाठी त्यांच्यावर उपचार होणं गरजेचं आहे, असंही रुपाली ठोंबरे यांनी सांगितलं.झटके येण्याचं लक्षण असल्यामुळे त्यांना त्वरित उपचाराची गरज आहे. आज पुण्यात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2024 मध्ये राष्ट्रवादी अर्धी सुद्धा राहणार नाही असं विधान केलं होतं. त्यालाच रूपाली ठोंबरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *