पुणे जिल्ह्यातील “या” गावात पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीचे भयंकर कृत्य ; आधी राहत्या घरात दिला गळफास, नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी डोंगरावर मृतदेह जमिनीत पुरला

पुणे जिल्ह्यातील “या” गावात पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीचे भयंकर कृत्य ; आधी राहत्या घरात दिला गळफास, नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी डोंगरावर मृतदेह जमिनीत पुरला

पुणे

अनैतिक संबधाच्या संशयावरुन पतीनेच 30 वर्षीय पत्नीचा खुन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहत परिसरातयेथे ही घटना घडली आहे.

हत्या करून पतीने कुटुंबातील व्यक्तींच्या मदतीने महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची माहिती देखील समोर आली आहे. या प्रकरणी चौघांना खुन करुन मृतदेहाची विल्हेवाट लावुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी चाकण पोलीसांनी अटक केली आहे. गोरक्ष देशमुख, रोशन भागात, देवानंद मनवर आणि बबन देखमुख असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नवे आहेत.

दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.चाकण परिसरात देशमुख कुटुंब नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास होते. दरम्यान महिलेचा पती गोरक्ष देशमुख याला पत्नीचे बाहेर अनैतिक संबध असल्याचा संशय होता आणि याच संशयातुन पती गोरक्ष याने कुटुंबातील व्यक्तींच्या मदतीने पत्नीला रहात्या घरात गळफास देऊन तिचा खून केला.

खुन करुन महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आळंदीफाटा येथील डोंगरावर मृतदेह जमिनीत पुरला.दरम्यान पत्नीच्या खुनाचा सुगावा न लागावा यासाठी पतीने आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार चाकण पोलीसांत दिली होती.

तपस सुरु असताना पतीनेच रहात्या घरात पत्नीचा खुन करुन तिचा मृतदेहाची जमिनीत पुरल्याचा उलगडा झाला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *