पुरंदरमधील देव व मंदिरे आहेत का सुरक्षित??? “या” गावातुन देवाचे जवळपास चार लाखाचे सोन्याचे दागिणे केले लंपास

पुरंदरमधील देव व मंदिरे आहेत का सुरक्षित??? “या” गावातुन देवाचे जवळपास चार लाखाचे सोन्याचे दागिणे केले लंपास

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील सोमर्डी येथील अशोक भिवा पन्हाळकर, वय 53 मौजे सोमुर्डी ता. पुरंदर जि. पुणे यांनी तक्रार दिली की काळभैरवनाथ मंदिरातून सोन्याचे दागीणे चोरी झाले आहेत.

समक्ष सासवड पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद देतो की, मी वरील पत्त्यावर माझ्या बायका मुलासह राहतो. गावातील काळभैरवनाथ मंदिरामध्ये पुजारी म्हणून काम करतो. गावातील काळभैरवनाथ मंदिरातील साफसफाई स्वच्छता दोन वेळी देवाची पूजा,आरती अशी कामे मी करतो. गावातील लोक या बदल्यात मला धान्य वगैरे देतात.

देवाचे मुकुट देवाचा अश्व पादुका आणि काळभैरवनाथ जोगेश्वरी ची चांदीची मूर्ती मंदिरामध्ये आहे. या मूर्ती आम्ही सणावारासाठी फक्त बाहेर काढतो नाहीतर त्या माझ्या ताब्यात घरी असतात. मंदिरात फक्त दगडी मूर्ती असते. देवाला साधारण 10 तोळ्याचे सोन्याचे दागिने आहेत. ते दागिने आम्ही फक्त यात्रेमध्ये आणि नवरात्रीमध्ये देवाला घालतो. दागिने सरपंचाच्या ताब्यात असतात. मागील सोमवारी घटस्थापने दिवशी आम्ही देवाला सोन्याचे दागिने घातलेले होते.तसेच चांदीचा अश्व पादुका व जोगेश्वरी भैरवनाथ चांदीची मूर्ती सुद्धा पूजेसाठी पायथ्याला ठेवली होती.

आज तारीख 28.9.2022 रोजी सकाळी 6.00 वाजता मंदिरात गेलो. देवपूजा आरती आटोपली आणि 7.00 वाजताच्या सुमारास पुन्हा आतील गाभा-रा कुलूप लावून बंद केला. त्यानंतर दुस-रा मंदिरामध्ये पूजेसाठी गेलो. त्यानंतर मी घरी गेलो नाश्ता केला व 9.30 वाजताची सुमारास पुन्हा भैरवनाथ मंदिरामध्ये आलो. त्यावेळी मला गाभार्याचा दरवाजाला लावलेला कोयंडा तुटलेला दिसला. त्या ठिकाणी मला कुलूप दिसले नाही.

मी आजूबाजूला कुलूप पाहिले, परंतु कुलूप त्या ठिकाणी नव्हते. मी दरवाजा उघडून आत गेलो देवीच्या अंगावर पाहिले तर देवीच्या गळ्यातील सर्व सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत. तसेच मूर्तीच्या समोर ठेवलेला चांदीचा अश्व पादुका व मूर्ती त्या ठिकाणी दिसली नाही. मी लगेच बाहेर आलो बाजूच्या दुकानासमोर गावातील लोक होते. त्यांना बोलावले आणि त्यांना झालेला प्रकार सांगितला त्यानंतर गावातील बरेच लोक जमले. त्यांनी पण पाहिले त्यानंतर पोलीस स्टेशनला कळवले.

चोरी गेलेल्या दागिन्यांचे वर्णन खालील प्रमाणे

  1. 75,000 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र
  2. 1,75,000 35 ग्रॅम वजनाचा एक राणीहार
  3. 65,000 15 ग्रॅम वजनाचा सोन्याचा पुतळा हार
  4. 25,000 देवाची चांदीची त्रिमूर्ती 500 ग्रॅम वजनाची
  5. 25,000 चांदीच्या पादुका 500 ग्रॅम वजनाच्या
  6. 35,000 एक चांदीचा अश्व 700 ग्रॅम वजनाचा

एकूण 4,00000/-रूपयाचे सोन्या चादींचे दागिने व मुर्ती,अशाप्रकारे वस्तू कोणीतरी अज्ञात चोराने गाभार्याच्या दरवाज्याच्या कोयडा तोडून आत प्रवेश करून चोरून नेल्या आहेत.

तरी आज दिनांक 28. 9. 22 रोजी सकाळी 7.00 ते 9.30 वाजताच्या दरम्यान कोणीतरी अनोळखी चोराने काळभैरवनाथ मंदिर सोमुर्डी येथील गाभार्याचा दरवाज्याचा कोंडा तोडून आत प्रवेश करून देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने,मुर्ती वरील किंमत 400000 रुपयाचे चोरून नेले. म्हणून माझी अनोळखी व्यक्तीविरुद्ध फिर्याद आहे .सोन्याचे दागिने व वस्तू मी पुन्हा दाखवल्यास ओळखू शकतो.

पुढील तपास पोलिस निरिक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई झिंजुर्के करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *