सावधान !!!!       “रात्रीस खेळ चाले”, पुरंदर तालुक्यातील “या” गावात एकाच रात्री चार ठिकाणी झाली चोरी

सावधान !!!! “रात्रीस खेळ चाले”, पुरंदर तालुक्यातील “या” गावात एकाच रात्री चार ठिकाणी झाली चोरी

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या पुर्वेस असणार्या आंबळे गावात एकाच रात्री चार घरांमध्ये चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

आंबळे गावातील बहुतांश रहिवाशी हे शेतकरी असुन दिवसभर शेतात काम करुन रात्री गाढ झोपी गेले असताना हा भयंकर प्रकार घडला आहे.

रविंद्र दरेकर, दत्तात्रय बधे, त्र्यंबक दरेकर तर अनिल शेंडगे यांच्या घरी एकाच रात्री चोरी झाली आहे.पैकी सर्वात मोठी चोरी ही रविंद्र दरेकर यांच्या घरी झाली असुन खुप मोठी रोख रक्कम व सोन्याच्या दागिण्यावर चोरांनी हात साफ केला आहे.

सदर घटना कळताच जेजुरी पोलिस स्टेशनचे बिट अंमलदार पिंगळे यांनी घटनास्थळाची पाहणी करुन ज्यांच्या घरी चोरी झाली त्यांच्याकडुन माहिती घेतली.व नागरिकांनीही रात्रीचे सतर्क राहण्याचे आवाहन केले.

सदर प्रकार एकाच रात्रीत घडल्यामुळे गावात सध्या घबराटीचे वातावरण असुन पोलिसांनी पेट्रोलिंग कार फिरवण्याची मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *