आम्हाला ईच्छा मरणाची परवानगी द्या ; पुरंदर तालुक्यातील “या” ग्रामस्थांचा विशेष ग्रामसभेत एकमुखी ठराव

आम्हाला ईच्छा मरणाची परवानगी द्या ; पुरंदर तालुक्यातील “या” ग्रामस्थांचा विशेष ग्रामसभेत एकमुखी ठराव

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील होऊ घातलेल्या छञपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाला पारगाव येथील ग्रामस्थांनी एकमुखी कडाडून विरोध दर्शविला. आमच्या जमीनींवर बळजबरीने प्रकल्प लाटून मरण्यापेक्षा ;आम्हाला ईच्छा मरणाची परवानगी द्या असा ठराव सरपंच प्रियंका मेमाणे यांनी मांडला त्याला विशेष ग्रामसभेने एकमुखी संमती दिली.

आज दि.६ रोजी पारगाव येथील श्री. भैरवनाथ सभा मंडप या ठिकाणी पारगाव सकाळी १० वा. विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. माजी सरपंच लक्ष्‍मण गायकवाड, विठ्ठल मेमाणे, सर्जेराव मेमाणे, उपसरपंच चेतन मेमाणे, विजय गांजुरे, अनिल मेमाणे, बाळासो गोविंद मेमाणे, कैलास मेमाणे इत्यादींनी व्यक्त केला. उपसरपंच महेश मेमाणे, ज्योती भाऊसो मेमाणे, ज्योती दीपक मेमाणे, अर्चना मेमाणे, दादा मेमाणे, माणिक मेमाणे,  वर्षा मेमाणे, शिवाजी मेमाणे विठ्ठलबुवा मेमाणे बहुसंख्य महिला, शेतकरी उपस्थित होते.

आम्ही विमानतळाला एक इंचही जमीन देणार नाही. आणि शासनाने जर आमच्यावर बळजबरी केली तर लोकशाही मार्गाने आपण परत पुन्हा आंदोलन उभे करणार आहोत. जर विरोध असूनही तुम्ही विमानतळाचा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला जात असेल तर जगून काय फायदा? विमानतळाचा प्रकल्प स्वीकारून क्षणाक्षणाला मारण्यापेक्षा एकदाच मेलेले बरे म्हणून राष्ट्रपतीं कडून इच्छा मरण घेऊ. तसेच विमानतळ विरोधी गावांमध्ये काही लोकांकडून जाणून बुजून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये.

आपण सर्व गाव एक आहोत आणि एकच राहणार. विमानतळाला जाहीर विरोध होता आहे आणि राहणार आहे. जमीनी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, विमानतळ करणारांच करायच काय खाली डोक वर पाय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. महाराष्ट्राचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस हे (दि.७ रोजी) पुरंदरच्या दौ-यावर आहेत. यावेळी त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचेही यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *