महाराष्ट्रावर शोककळा !!!!!            शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे निधन

महाराष्ट्रावर शोककळा !!!!! शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे निधन

पुणे

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात होऊन त्यांचे दुख:द निधन झाले आहे.या अपघातात विनायक मेटेंसह त्यांचा सुरक्षारक्षकही गंभीर जखमी झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवर हा अपघात झाला असून पहाटे 5:30 वाजता भातान बोगद्याजवळ ही घटना घडली.

पुणे ते मुंबई प्रवास करताना मेटे यांचे वाहन अनोळखी वाहनावरती आदळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच अपघात झाला तेव्हा विनायक मेटे यांचा मुलगा गाडी चालवत असल्याचंही सांगितलं जातंय.

या अपघातात मेटे यांचा मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. मात्र मेटे आणि त्यांच्या सुरक्षारक्षक या अपघातात गंभीर जखमी झाले असून अपघातातील जखमींवर पनवेलच्या एम. जी. एम. रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचार सुरु असताना विनायक मेटे यांची प्राणज्योत मालवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *