आता संजय राठोडांना चित्राताई राखी बांधायला जाणार ??? : रुपाली पाटील

आता संजय राठोडांना चित्राताई राखी बांधायला जाणार ??? : रुपाली पाटील

पुणे

दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. आज पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. शिंदे गटातील आणि भाजपातील एकूण १८ आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मंत्रिमंडळात एकाही महिला आमदाराला स्थान देण्यात आलेलं नाही.

तसेच टीईटी घोटाळ्यात नाव आलेले अब्दुल सत्तार आणि पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आलेले संजय राठोड या दोघांनाही मंत्रिपद दिल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यावरुनच आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे.

“भाजपने अनेक वेळा महिलांचा सन्मान करण्याचा दिखावा केला आहे. पण आज एकही माता भगिनीला मंत्रिमंडळात स्थान नाही. त्यामुळे माता भगिनीना विंनती आहे कि ज्यांनी महाराष्ट्रच्या मातीशी गद्दारी केली आहे, ते लोक तुम्हाला कधीच न्याय देऊ शकत नाहीत.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात भाजपच्या चित्रा वाघ, देवेंद्र फडणवीस, आणि किरीट सोमय्या यांनी ओरडून ओरडून सांगितलेलं कि, संजय राठोड यांनी बलात्कार केला आहे, गर्भपात केला आहे. महाविकास आघाडीत महिलांचं शोषण करणारे लोकं आहेत.

आता मात्र त्याच संजय राठोड यांना पवित्र करून घेतलं आहे. आता चित्राताई त्यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना राखी बांधणार आहेत. जल्लोष करणार आहेत. मग आता कुठे गेले तुमचे आरोप?” अशा आक्रमक शब्दात रुपाली पाटील यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

तसेच संजय राठोड यांनी शपथ घेतल्यावर चित्रा वाघ यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत त्या म्हणाल्या होत्या कि, “माझा लढा अजून संपलेला नाही. लढेंगे और जितेंगे भी!” यावर देखील रुपाली पाटील यांनी टीका केली. त्या म्हणाल्या कि, “तुमचा लढाही खोटा आणि तुम्ही कधीही जिंकू शकत नाही. तुमचा खरा चेहरा राज्यातील माता भगिनींच्या समोर आला आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *