पुणे जिल्ह्यातील “या” गावच्या सरपंचांचे हुकूमशाही बेपर्वाई कामकाज,तसेच अनियमित कारभार ; चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे सुनावणीस न्यायप्रविष्ट

पुणे जिल्ह्यातील “या” गावच्या सरपंचांचे हुकूमशाही बेपर्वाई कामकाज,तसेच अनियमित कारभार ; चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे सुनावणीस न्यायप्रविष्ट

पुणे

दौंड तालुक्यातील यवत गावचे सरपंच समीर दोरगे यांच्या चालू कार्यकाळात समीर दोरगे यांनी पदाची कोणतीही कर्तव्ये पार न पाडणे,नियमांचे पालन न करणे ,हुकूमशाही व बेपर्वाई पद्धतीने कामकाज ,ग्रामसभा कामकाज अनियमित,ग्रामपंचायत गाळे आर्थिक गैरव्यवहार केले असलेबाबत ग्रामपंचायत सदस्य सदानंद दोरगे व मनोहर खुटवड यांनी तक्रार केली होती, सदर बाबत चौकशी अहवाल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचेकडे सुनावणीस न्यायप्रविष्ट असल्याचे सदानंद दोरगे यांनी सांगितले.

यावेळी सदानंद दोरगे यांनी सांगितले की सरपंच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन काम करत नाहीत,अनेक निर्णय बळजबरीने घेतात ग्रामपंचायत ही सरपंच समीर दोरगे यांची खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे त्यांची वागणूक दिसत असल्याचे सदानंद दोरगे यांनी सांगितले तसेच चौकशी अधिकारी तथा गटविकास अधिकारी यांनी केलेल्या चौकशी अहवालामध्ये सरपंच समीर दोरगे यांनी आर्थिक अनियमितता, मनमानी,आर्थिक गैरव्यवहार, व तात्पुरता संशयित व कायमस्वरूपी अपहार केले असल्याचे नमूद केले असल्याचे सदानंद दोरगे यांनी सांगितले आहे.तसेच शासनाच्या आदेशाचे अवमान करणे,ग्रामपंचायत हिट न जोपासता मनमानी करणे, शासननिर्णय प्रमाणे सभा न घेणे,पदाच्या कर्तव्यात कसूर करणे अशा कारणासाठी कारवाईस पात्र असलेबाबत चौकशी अधिकारी तथा गटविकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना अहवाल सादर केला असलेबाबत सदानंद दोरगे यांनी माहिती दिली आहे.

ग्रामपंचायत सदस्य मनोहर खुटवड यांना तक्रारी बाबत विचारले असता त्यांनी सांगितले की “आमचे नेते सदानंद दोरगे यांनी यवत ग्रामपंचायत येथे सरपंच समीर दोरगे यांचा चालू असलेला गैरकारभार बाहेर काढण्यासाठी केलेल्या तक्रारीला माझा पाठिंबा आहे, लवकरच कायदेशीर मार्गाने आम्हाला न्याय मिळेल असे सांगितले“.

सदानंद दोरगे व मनोहर खुटवड यांनी केलेल्या तक्रारी संदर्भात सरपंच समीर दोरगे यांना विचारणा केली असता,”चौकशी न करता कनिष्ठ कर्मचारी चौकशी करण्यासाठी पाठवल्याचा धडधडीत आरोप सरपंच समीर दोरगे यांनी केला आहे.दबावतंत्र वापरून सदानंद दोरगे यांनी चौकशी अधिकारी हाताला धरूनच आकडे वाढवले आहेत असा देखील आरोप केला.अहवाल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचेकडे न्यायप्रविष्ट असून सुनावणीत मी माझी बाजू योग्य पद्धतीने मांडणार असल्याचे सरपंच समीर दोरगे यांनी सांगितले.

चौकशी अधिकारी तथा गटविकास अधिकारी यांना चौकशी अहवाल व त्यांचेवर सरपंचांनी केलेल्या आरोपाबाबत विचारणा करण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *