पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार !!!!! पतीने पत्नीच्या संशयित प्रियकराचे अपहरण करुन त्याच्या गुप्तांगावर वेदनाशामक स्प्रे मारून अतिशय क्रुरपणे दिल्या यातना

पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार !!!!! पतीने पत्नीच्या संशयित प्रियकराचे अपहरण करुन त्याच्या गुप्तांगावर वेदनाशामक स्प्रे मारून अतिशय क्रुरपणे दिल्या यातना

पुणे

पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडवणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नीच्या संशयित प्रियकराचे अपहरण करुन त्याच्या गुप्तांगावर वेदनाशामक स्प्रे मारून अतिशय क्रुरपणे यातना दिल्या. या प्रकरणी पीडित व्यक्तीने दोन आरोपींच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी या गंभीर घटनेची तातडीनं दखल घेवून आरोपी अजय आणि प्रमोद यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वाकड पोलिसांनी प्रमोदला अटक केली असून आरोपी राजेंद्र अद्यापही फरार आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीचं पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. त्यामुळे रागाच्या भरात आरोपीने पीडित व्यक्तीचं वाकडच्या छत्रपती चौकातून अपहरण केलं.

त्यानंतर आरोपीने पीडित व्यक्तीला वारजेच्या दिशेनं खासगी चारचाकी कारमध्ये घेऊन जात असताना जबर मारहाण केली.वारजे येथील एका फ्लॅटच्या बंद खोलीमध्ये पीडित व्यक्तीला नेण्यात आले.

त्यानंतर त्याला ऊस,लोखंडी रॉड आणि चामडी पट्ट्याने बेदम मारहाण करून गुप्तांगावर, नाकावर आणि डोळ्यावर गंभीर इजा केली. त्यानंतर आरोपी पीडित व्यक्तीला जीवे मारण्यासाठी दुसरीकडे घेऊन जात होता.

त्यावेळी बिल्डिगच्या पार्किंगमधून पीडित व्यक्तीनं पळ काढून हल्लेखोरांच्या तावडीतून स्वत:ची सुटका केली, अशी माहिती वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यजित माने यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *