संतापजनक !!!!!  पुण्यात “या” ठिकाणी दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाचा बलात्कार

संतापजनक !!!!! पुण्यात “या” ठिकाणी दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाचा बलात्कार

पुणे

पुण्यात संतापजनक घटना घडली आहे. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाने बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळं शहरात खळबळ उडाली आहे. पीडित मुलीला जबरदस्तीने एका पडक्या इमारतीत नेले आणि तिथे तिच्यावर अतिप्रसंग केला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात स्कुल बसच्या चालकाने विद्यार्थिनीवर बलात्कार केला. ही मुलगी दहावीत शिक्षण घेत आहे. पीडिता स्कूल बसमधून ये-जा करत होती. त्याचवेळी स्कूल बसचालक आणि अल्पवयीन मुलीची ओळख झाली होती. याच ओळखीचा गैरफायदा घेऊन नराधमानं तिच्यावर बलात्कार केला.

दहावीत शिकणारी ही मुलगी स्कूल बसमधून ये-जा करत असतानाच, पीडिता आणि आरोपीची ओळख झाली होती. पीडित मुलीला आरोपीने रिलेशनशिपमध्ये राहणार का, अशी विचारणा केली होती. त्यानंतर तिला एका पडक्या इमारतीत जबरदस्तीने नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केले. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *