पुणे जिल्ह्यातील स्तुत्य उपक्रम !!!!!           “या” ग्रामपंचायीत स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरावा अमृतमहोत्सवी कार्यक्रम अतिशय अनोख्या उपक्रमांनी साजरा

पुणे जिल्ह्यातील स्तुत्य उपक्रम !!!!! “या” ग्रामपंचायीत स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरावा अमृतमहोत्सवी कार्यक्रम अतिशय अनोख्या उपक्रमांनी साजरा

पुणे

पुणे जिल्ह्यातील मिरवडी येथे पंचायत समिती दौंड व जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र्यांचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम दौंड चे गटविकास अधिकारी श्री. अजिंक्य येळे , कृषी अधिकारी झरांडे,विस्तार अधिकारी ताकवणे , पं. स.सदस्य सुशांत दरेकर,जि.प.सदस्य गणेश कदम, प्रशासन अधिकारी कुंभार साहेब, कृषी विस्तार अधिकारी ढोले साहेब,वनाधिकारी शिवकुमार बोंबले यांच्या उपस्थितीत संपूर्ण गावातील स्वछता अभियान तसेच आरोग्यविभागामार्फत मोफत आरोग्य तपासणी,बूस्टर डोस लसीकरण त्याचबरोबर संपूर्ण गावातून प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुलांची लेझीम सहित वृक्ष दिंडी काढण्यात आली.

त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत मिरवडी च्या वतीने नर्सरी चे पायपूजन करण्यात आले.या वेळी 75 आकडा झाडांच्या माध्यमातून रेखाटून शाळकरी मुलांनी सिडबॉल , बिया वाटप केल्या तसेच गावातील 75 पेक्षा अधिक वयाच्या लोकांना पंचायत समिती मार्फत प्रत्येकी एक केशर आंब्याचे झाड वाटप करण्यात आले त्याचबरोबर मिरवडी चे सरपंच सागर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त स्वखर्चाने त्यांनी 500 झाडांचे वृक्षारोपण ही करण्यात आले.

ग्रामपंचायत मिरवडी च्या माध्यमातून ज्ञान समृध्दी वाढिसाठी मेमाणवाडी येथे सार्वजनिक ग्रंथालय उद्धाटन उपस्थित मान्यवर व शाळेतील चिमुकल्या च्या हस्ते करण्यात आले या वेळी तेथील विविध अंगी असणारी पुस्तके पाहुन गटविकास अधिकारी यांनी समाधान व कौतुक व्यक्त केले.

या वेळी मुलानी विविध स्पर्धा , वेशभूषा स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा यांचे उत्तम सादरीकरण केले या वेळी सुशांत दरेकर यांनी शाळेसाठी कार्यक्रम चे औचित्य साधुन 5000रु देणगी स्वरूपात रोख देवु केलं व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.साहेबराव गायकवाड यांनी वृक्षलागवड साठी रोख 5000 रु सरपंच सागर शेलार यांसकडे सुपूर्त केलं या वेळी गावातील सरपंच,उपसरपंच,सदस्य,ग्रामसेवक , चेअरमन,व्हा.चेअरमन,संचालक सोसायटी , शिक्षक , मुले ,कर्मचारी , ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *