पुरंदर तालुक्यातील “या” गावात चारचाकी गाडीतून गावठी हातभट्टी दारू तस्करी करणाऱ्यांना अटक…. तब्बल सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

पुरंदर तालुक्यातील “या” गावात चारचाकी गाडीतून गावठी हातभट्टी दारू तस्करी करणाऱ्यांना अटक…. तब्बल सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

पुरंदर

सासवड शहरात गावठी हातभट्टी दारूची चारचाकी गाडीतून तस्करी करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात सासवड पोलिस ठाण्यात सरकारी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

सासवड पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार  भोर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांचे आर.टी.पी.सी. पोलीस नाईक सोमेश राऊत यांनी सासवड पोलीस स्टेशनला कळवले की बोपगाव सासवड रोडने एक सिल्वर रंगाची सेंट्रो कार MH 12 AF 5580   मधून गावठी दारू घेऊन जाणार आहेत.
 
त्यानंतर सासवड पोलिस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी तात्काळ  एक पथक तयार करून मिळालेल्या बातमीप्रमाणे कोडीत नाका येथे रोडच्या कडेला गाडी उभी करून थांबले थोड्याच वेळात बोपदेव सासवड रोडने सिल्व्हर रंगाची सेंट्रो कार क्रमांक MH 12 AF 5580  येताना दिसली.

तेव्हा या कारच्या चालकाला पोलीस पथकाने थांबण्यास सांगितले असता तो  गाडी थांबवुन पळून जाऊ लागला पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले त्यानंतर त्याला नाव विचारल्यानंतर आरोपीने त्याचे नाव विकी राजू कुंभार वय ३७ वर्षे राहणार साईट सोसायटी धनकवडी पुणे असे सांगितले.

या छाप्यात १ लाख रुपये किंमतीची सिल्व्हर रंगाची सेंट्रो कार व ३५ लिटर मापाचे हातभट्टी गावठी दारूचे  काळे रंगाचे प्रत्येकी २ हजार रुपये किमती प्रमाणे 20 हजार रुपयांचे  १० कॅन असा  १ लाख २० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे .सदर आरोपी विरोधात मु.प्रो.का.क. ६५ (ई )  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *