धक्कादायक !!!!!   पुरंदर तालुक्यातील “या” गावात विजचोरीचा गुन्हा दाखल,तब्बल पस्तीस लाख रुपयांच्या वीज चोरीचा दावा

धक्कादायक !!!!! पुरंदर तालुक्यातील “या” गावात विजचोरीचा गुन्हा दाखल,तब्बल पस्तीस लाख रुपयांच्या वीज चोरीचा दावा

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील पवारवाडी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला असून येथील एका कंपनीवर विजचोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . विक्रांत विलासराव सपाटे,  वय – 44 वर्षे, व्यवसाय – नोकरी, रा. गणेशखिंड महावितरण क्वार्टर्स, पुणे यांनी यासंदर्भात सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .

याबाबतीत सासवड पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार दि 23/03/2022 रोजी फिर्यादी व त्यांचे सहकारी,  प्रज्ञा रमेश रोकडे (सहाय्यक अभियंता),  सागर जोडवे (सहाय्यक सु व अं अधिकारी),  गणेश कराड  (तंत्रज्ञ)  यांच्यासमवेत  वरिष्ठ  कार्यालयाच्या आदेशानुसार नारायण दगडू पवार यांचे ‘Sainath Ice factory ‘(ग्राहक क्र. 188121869232), पवारवाडी, ता. पुरंदर, जिल्हा पुणे 412308 येथील वीज कनेक्शनची तपासणी करण्यासाठी पोहचलो असता सदर ठिकाणी ग्राहक क्र. 188121869232, मीटर क्र. MHD09281, SECURE  कंपनीचा वीज मीटर आढळला. सदर मीटरवरील रीडिंग 61705 kwh असे होते. त्यानंतर महावितरण कंपनीच्या Transformer जवळील L T Distribution box ची तपासणी केली असता सदर ठिकाणी 4 कोअर काळ्या रंगाची crocodile Clips  जोडलेली अतिरिक्त वायर आढळून आली. सदर वायर Distribution box पर्यंत पोहचत होती.

सदर वायरची अधिक तपासणी केली असता ती वायर जमिनीखालून नेऊन Sainath Ice factory मधील industrial एम. सि. बी. स्वीच पर्यंत नेलेली आढळून आली. तसेच industrial एम.सि.बी. स्वीच बंद करून सदर वायर स्वीच च्या आउटगोइंगला व Distribution box ला जोडून मीटर बायपास करून वीजचोरी करता येईल अशा प्रकारची व्यवस्था केल्याचे निदर्शनास आले. तसेच सदर ग्राहकाने अश्या प्रकारे वीजचोरी करीत असल्याचे मान्य केले. आढळून आलेल्या वस्तुस्थितीचे फोटो आणि व्हीडीओ रेकॉर्डिंग घेण्यात आले.

दिसत्या वस्तुस्थितीचे पंचनामा तयार करण्यात आला व वीजचोरीसाठी वापरण्यात आलेल्या 4 कोअर काळ्या रंगाची crocodile Clips  जोडलेली केबल, एम.सि.बी स्वीच, मुद्देमाल म्हणून जप्त करून ताब्यात घेण्यात आला व त्यावर फिरते पथकाचे अधिकारी यांचे सह्यांचे कागदी सील चिटकवण्यात आले. तपासणी केली बाबतचे स्थळ तपासणी अहवाल क्र. 16204 दि. 23/03/2022 जागेवरच तयार करण्यात आला. 

अशा प्रकारे  नारायण दगडू पवार, पवारवाडी, ता. पुरंदर, जिल्हा पुणे 412308 यांनी मागील 12 महिन्यात 2,34,243 युनिट्सची वीजचोरी केली असून महावितरण कंपनीचे रु. 35,86,835/-  चे आर्थिक नुकसान केले आहे. त्यांच्याकडे तपासणी वेळी 195.36  HP जोडभार आढळून आला. त्याची तडजोडीची रक्कम 19,60,000/- रु एवढी होते. सबब वरील प्रमाणे केलेल्या वीजचोरी बाबत फिर्यादी यांनी त्यांच्या विरुध्द भारतीय विद्युत कायदा 2003 चे कलम 135 नुसार कायदेशीर फिर्याद दाखल केली  आहे. तसेच स्थळ तपासणी अहवाल, घटनास्थळ / जप्ती पंचनामा, असेसमेंट शीट, विजचोरी बिल इत्यादी कागदपत्रांच्या मुळ प्रती, फोटोग्राफ्स, ग्राहकाचे CPL व जप्त मुद्देमाल(काळ्या रंगाची केबल  crocodile Clips  सह), फोटोग्राफ्स व व्हीडीओ असलेला पेन ड्राईव्ह सोबत दिला  आहे.

फिर्यादी यांनी  वेळोवेळी वीज चोरी करणारे नारायण दगडु पवार यांना विज चोरीची विज बील भरणेबाबत सांगितले परंतु त्यांनी आज पर्यत टाळाटाळ केली असल्याने आजरोजी त्यांच्या विरुध्द तक्रार देण्यात आली  आहे.   
सासवड पोलिसांनी भारतीय विद्युत कायदा 2003 चे कलम 135 गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *