पुरंदर तालुक्यातील “या” ठिकाणी छोट्या मुलीच्या गळ्यातील दागीण्यावर चोरट्यांनी मारला डल्ला

पुरंदर तालुक्यातील “या” ठिकाणी छोट्या मुलीच्या गळ्यातील दागीण्यावर चोरट्यांनी मारला डल्ला

पुरंदर

सासवड शहरातील पी.एम.टी.स्टॅड परिसरातून एका छोट्या मुलीच्या गळ्यातील सोन्याच्या दागिण्याची चोरी झाल्याची घटना घडली असून भावना योगेश फुले वय 29 वर्ष रा.खळद फुलेमळा ता.पुरंदर जि.पुणे यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 

याबाबतीत सासवड पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार दि.23/05/2022 रोजी सयंकाळी 6:20 ते 6:40 वा. चे दरम्यान  सासवड येथील पी.एम.टी.स्टॅड जवळील परिसरात फिर्यादी यांनी फिर्याद दिली आहे  की, 10,000/- रू किमतीचे  दोन ग्रॅम वजनाचा बदाम काळे दो-याचे गोप मध्ये ओवलेला  सोन्याचा बदाम मुलगी त्रिषाली हिचे गळयातुन  कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला आहे. म्हणुन त्यांनी  अज्ञात चोरटया विरूध्द तक्रार दिली  आहे.

सासवड पोलिसांनी भा.द.वि.कलम 379 अन्वये अज्ञात चोरटया विरूध्द गुन्हा दाखल केला असून सासवडचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. सैय्यद पुढील तपास करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *