सासवड – कोडीत – गराडे एस.टी. सेवा सुरू करा- : योगेश खुटवड

सासवड – कोडीत – गराडे एस.टी. सेवा सुरू करा- : योगेश खुटवड

पुरंदर

गेले कितीक दिवस परिवहन बस सेवा बंद होती परंतु आता बससेवा चालू झाली असून सासवड कोडीत गराडे बससेवा लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी पत्रकार योगेश खुटवड यांनी सासवड आगारच्या व्यवस्थापक मनीषा इनामके यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात खुटवड यांनी म्हटले आहे की, गेले कित्येक दिवस आपली परिवहन सेवा बंद होती, त्यामुळे चाकरमानी, विद्यार्थ्यांना वेळेत कामावर. महाविद्यालयात पोचण्यासाठी विलंब होत होता, परंतु आता परिवहन सेवा सुरळीत चालू झाली आहे.

तसेच कोडीत. गराडे. पश्चिम पट्ट्यातील विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क साधून बससेवा सुरळीत चालू व्हावी यासाठी मागणी केली होती, शेतकरी. चाकरमानी. विद्यार्थी या सर्वांनाच बससेवा सुरळीत नसल्यामुळे प्रचंड अडचणी निर्माण होत आहेत, त्यानुषंगाने योगेश खुटवड यांनी सासवड आगार व्यवस्थापक इनामके यांची भेट घेऊन निवेदन दिले, यावेळी सोमुर्डी गावचे युवा नेते अमोल भोराडे उपस्थित होते.

निवेदनाच्या अनुषंगाने इनामके यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या निवेदनाची दखल तात्काळ घेतली जाईल, तात्काळ सासवड गराडे सोमुर्डी बससेवा सुरू करण्यात येईल परंतु नागरिकांकडून पुरेसा प्रतिसाद मिळावा जेणेकरून उत्पन्नात वाढ होईल आणि जास्तीच्या फेऱ्या चालू करू, परिवहन विभाग नागरिकांच्या सेवेसाठी आहे परंतु नागरिकांनी देखील परिवहन विभागाला सहकार्य करून जास्तीत जास्त एसटी महामंडळाच्या बससेवेचा लाभ घ्यावा अशी माहिती सासवड आगार व्यवस्थापक मनीषा इनामके यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *