सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सन २०२२ – २३ चे ऊस लागण धोरण जाहीर

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सन २०२२ – २३ चे ऊस लागण धोरण जाहीर

पुणे

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२२- २०२३ या गाळप हंगामासाठी पाडेगाव ऊस संशोधन केंद्र व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या सल्ल्याने उस लागण धोरण जाहीर केले आहे.

कारखान्याने सोमेश्वरकडून प्रथमच १५ दिवस अगोदर ऊस लागवडीसाठी परवानगी मिळाली आहे. आडसाली हंगामासाठी को ८६०३२, व्हीएसआय ९८०५ या ऊसाच्या जातीसाठी १५ जून ते ३० जुलै दरम्यान परवानगी देण्यात आली आहे. तसेच कोएम ०२६५ को ८६०३२, व्हीएसआय ९८०५ या ऊस जातींसाठी १५ जून ते १५ जुलै परवानगी दिली आहे. पूर्व हंगामी ऊस लागणीकरीता कोसी ६७१, को ८६०३२, व्हीएसआय ९८०५, कोएम ०२६५ या ऊस जातींसाठी १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान परवानगी दिली आहे. एम. एस. १०००१ या ऊस जातीसाठी १५ ऑक्टोंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान परवानगी देणेत आली आहे. एमएस १०००१ ते यासाठी १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर व व्हीएसआय ०८००५ या ऊस जातीसाठी १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान परवानगी देणेत आली आहे.

सुरु हंगामासाठी एम. एस. १०००१, कोसी ६७१, को ८६०३२, व्हीएसआय ९८०५ या ऊस जातीसाठी १५ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी दरम्यान परवानगी देणेत आली आहे. कोएम ०२६५ या ऊस जातीसाठी १५ डिसेंबर ते ३१ जानेवारी दरम्यान परवानगी देणेत आली आहे. २८ फेब्रुवारी अखेर तुटलेल्या सर्व जातीचा खोडवा उसाच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. सभासदांनी सातबारा प्रमाणे नोंदी देणे गरजेचे आहे.

शेतात रोप लागण ज्या दिवशी होईल त्याचीच लागण तारीख नोंद होईल. लागण तारखेनुसार ऊस तोडीसाठी आडसाली हंगामातील प्रथम पक्व होणाऱ्या ऊस जातीची को. ८६०३२. व्हि.एस.आय. ९८०५ या जातींची रोपे व टिपरी लागणीस प्राधान्याने तोड़ देण्यात येईल व नंतर आडसाली हंगामातील को. एम.०२६५ या जातीच्या ऊस रोपे लागणीच्या ऊसास व त्यानंतर आडसाली हंगामातील को. एम. ०२६५ या जातीच्या टिपरी लागणीच्या ऊसास तोड देण्यात येईल. – विराज निंबाळकर, ऊस विकास अधिकारी सोमेश्वर कारखाना.

१५ जून पासुन आडसाली ऊस लागण करणे करिता परवानगी देणेत आली आहे. क्रमवारी ड्रॉ पद्धतीने २० जूनला काढणेत येईल. ऊस लागण नोंदीचे फॉर्म सभासदांनी १३ जून पासून गट कार्यालयात भरून द्यावेत. तारखेपुर्वी ऊसाची नियमबाह्य लागण केल्यास सदर ऊसाची लागण पुढे १५ दिवस उशिरा ग्राह्य धरण्यात येणार आहे. सभासदांनी आडसाली ऊस सरसकट कापु नये असे झाल्यास ऊसाची लागण तारीख रद होईल व त्या ऊसाची लागण तारीख पुन्हा नव्याने देणे बंधनकारक राहिल. सदर ऊसाची नव्याने दिलेली नोंद खोडवा म्हणुन घेणेत येईल.

खोडव्यास व्यवस्थापनाने दिलेले कोणत्याही प्रकारचे अनुदान लागू होणार नाही. ऊसाची लागण ४.५ फुट किंवा ५ फुट पट्टा पद्धतीने केल्यामुळे प्रती एकरी ऊस उत्पादनात वाढ होत असुन पट्टा पद्धतीने लागवड केल्यामुळे ऊसावरील किड व रोग नियंत्रित करणे सोपे जाते. तसेच यांत्रिक पद्धतीने तोडणी करीता पट्टा पद्धतीने लागण करणे गरजेचे आहे. यामुळे उत्पादन वाढून फायदा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *