बीड
तालुक्यातील दादाहरी वडगाव शिवारात पाणी आणण्यासाठी शेजारच्या विहिरीवर गेलेले वडील पाण्यात पडले. हे पाहून मुलाने त्यांना वाचविण्यासाठी उडी मारली असता तो देखील पाण्यात पडला.
तर, दुसरा मुलगा त्या दोघांना वाचवण्यासाठी विहिरीत उतरला असता तोही पाण्यात पडला. दुसरा मुलगा बुडताना पाहून आईने विहिरीत दोर टाकला व दुसऱ्या मुलाला वाचवले. ही दुर्घटना घटना शुक्रवारी (ता.१३) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
तालुक्यातील दादाहरी वडगाव येथील शिवारात शहरातील बरकतनगर येथील रहिवाशी शेख सादिक शेख हमीद (वय ५८) व शेख रफीक शेख सादिक (वय २५,) यांची शेती असून जवळच नातेवाईक शहादत पठाण यांची जमीन आहे.
शहादत पठाण यांच्या विहिरीवर शुक्रवारी सायंकाळी शेख सादिक गेले होते. यावेळी पाय घसरून ते विहिरीत पडले. हे मुलगा शेख रफीक शेख सादिक याने पाहिले त्याने वडीलांना वाचविण्यासाठी विहिरीत उडी मारली मात्र, वडिलांना वाचविण्याच्या प्रयत्नात तोही बुडाला.
दोघांना वाचविण्यासाठी भाऊ शेख सादिक यानेही विहिरीत उडी मारली, तोही बुडू लागला, तेव्हा प्रसंगावधान राखत आईने दोर विहिरीत टाकला व त्यास पकडून शेख सादिक वर आला.
दरम्यान, बुडालेले पिता पुत्र विहिरीच्या तळाशी गेले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहचले असून गावकऱ्यांच्या मदतीने पिता पुत्राचे मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधार पडल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.
💐💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली