पुरंदर तालुक्यातील “या” गावात ट्रॅक्टर ट्रकला घासल्याचा जाब विचारला म्हणून टॉमीने मारहाण करून जीवे मारण्याची दिली धमकी

पुरंदर तालुक्यातील “या” गावात ट्रॅक्टर ट्रकला घासल्याचा जाब विचारला म्हणून टॉमीने मारहाण करून जीवे मारण्याची दिली धमकी

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील पिंपरे खुर्द गावाच्या हद्दीत ट्रॅक्टर ट्रकला घासल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून ट्रॅक्टर मालक  त्यासोबतच्या सात ते आठ जणांनी ट्रक चालकाला टॉमिने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून यासंदर्भात अनिल एकनाथ गार्डी वय 43 वर्षे धंदा-शेती,रा.जेऊर  ता.पुरंदर जि.पुणे यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.6/5/2022 रोजी दुपारी 4:30 वा.चे सुमारास मौजे पिंपरे खुर्द गावचे हद्दीत जेजुरी रेल्वे गेट क्रँस करून जेजुरी निरा रोडचे कडेला  ता.पुरंदर जि.पुणे  यातील आरोपी  1) कृष्णा लहु विघ्ने 2) दादा ज्ञानदेव विर 3) लहु निवृत्ती विघ्ने, 4) सोनी कृष्णा विघ्ने 5) छाया लहु विघ्ने 6) दादा ज्ञानदेव विर 7) योगेश लहु विघ्ने 8) शैला बबन सानप सर्व सध्या रा.सोमेश्वर कारखाना ता.बारामती जि.पुणे मुळ रा.वंजारवाडी ता.शिरुर (कासार ) जि.बिड  यांनी फिर्यादीचे  मालकीचा  ट्रक नं. एम.एच 09 जे 6615 यास ट्रॅक्टर एम.एच.11 सी.क्यु 1457 हा उजवे बाजुस  घासुन  गाडीची पार्कींग लाईट तुटली त्यावेळी त्यास फिर्यादी हे विचारण्यास गेला,” की तुझ्या ट्रॅक्टरने माझे गाडीची पार्कींग लाईट तुटली आहे” .असे विचारले त्यावेळी ट्रॅक्टर चालक आरोपी नं.1 कृष्णा लहु विघ्ने याने शिवीगाळ करुन त्याचे ट्रॅक्टर मध्ये असलेली टॉमी हातात घेवून ट्रॅक्टर मधुन खाली उतरुन फिर्यादीचे डोक्यात मारली व आरोपी 2 ते 8 यांनी  बेकायदा गर्दी जमाव जमवून हाताने व लाथा बुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करुन तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देवून दुखापत केली असल्याची तक्रार दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *