रस्त्यावर गाडी उभी करुन भाजीपाला घेताय सावधान !!!!! पुरंदरमध्ये “या” ठिकाणी भाजीपाला घेईपर्यंत गाडीतुन पळवला लॅपटॉप

रस्त्यावर गाडी उभी करुन भाजीपाला घेताय सावधान !!!!! पुरंदरमध्ये “या” ठिकाणी भाजीपाला घेईपर्यंत गाडीतुन पळवला लॅपटॉप

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील चांबळी गावातील रामवाडी येथे रस्त्याच्या कडेला भाजीपाला खरेदी करण्यासाठी थांबलेल्या एकाच्या चारचाकी गाडीतून चोरट्यांनी लॅपटॉप चोरून नेल्याची घटना घडली असुन गिरीश दामोदर शिंदे वय ३३ वर्ष, व्यवसाय खाजगी नोकरी रा. वाकड फ्लँट नं १२०२ सी बिल्डींग काँस्टँरिका हाउसिंग सोसायटी दत्तमंदीर रोड वाकड ता. मुळसी, जि. पुणे यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

यासंदर्भात सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारता.११-२-२०२२ रोजी दुपारी २ वा. चे. सुमारास मौजे चांबऴी रामवाडी ता.पुरंदर, जि.पुणे येथे फिर्यादी गिरीश शिंदे हे त्यांची कार नं.MH १४ JU ४५४२ हि रोडचे कडेला लाँक न करता लावुन भाजीपाला खरेदी करीत असताना एका मोटार सायकलवरुन दोन अनोऴखी इसम येवुन त्यांनी त्यांच्या कार मध्ये ठेवलेला ६८०००/-रूपये किमतीचा एका काऴे रंगाची बँग मध्ये ठेवलेला डेल कंपनीचा लँपटाँप त्याचे माँडेल नं.DELL Latitude E5450, Service Tag FH35N62, Invoice No 8040926962 असे असलेला  लँपटाँप चोरुन नेला आहे.

सासवड पोलिसांनी अज्ञात दोन इसमां विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *