पुरंदर तालुक्यातील “या” गावात तरुण महिलेचा विनयभंग करून पती व सास-याला मारहाण

पुरंदर तालुक्यातील “या” गावात तरुण महिलेचा विनयभंग करून पती व सास-याला मारहाण

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील गराडे गावातील मटवाडी येथे शेतीच्या विहीरीवरील महावितरणने तोडलेले  वीजेचे कनेक्शन पुन्हा जोडण्याच्या कारणातुन झालेल्या वादात महिलेला मारहाण करून तीचा विनय भंग करून पती व सासरे यांना शिवीगाळ मारहाण दमदाटी केल्याची धक्कादायक घटना घडली असून यासंदर्भात पीडित महिलेने सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल दिली आहे.

या संदर्भात सासवड पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार काल दुपारी अडीज चे सुमारास फिर्यादी महिला व त्यांचे पती  शेतामध्ये खुरपत असताना गट नं.१०२५ मधिल सामाईक विहीरीवरील विज कनेक्शन महावितरण कंपनीने तोडलेले जोडु लागले.

पीडित महिला त्यांच्या  पतींनी,” तुम्ही विज कनेक्शन जोडु नका “,असे म्हणालेचे कारणावरुन आरोपी चंद्रकांत रघुनाथ जगदाळे,स्वप्नील चंद्रकांत जगदाळे,संतोष विठ्ठल जगदाळे,लक्ष्मण दत्तात्रय जगदाळे,दिपक शंकर जगदाळे,प्रशांत सुनिल जगदाळे,अक्षय रामदास जगदाळे,मयुर स्वप्निल जगदाळे,गोरख रघुनाथ जगदाळे,रोषन नवनाथ जगदाळे सर्व रा. गराडे मटवाडी ता पुरंदर जि पुणे पैकी वरील पहिले चौघे यांनी पीडित महिलेला व भांडणे सोडविण्यास आलेल्या इतर तीन महिला यांचे हात धरुन वाईट हेतुने पीडितेचे  झंप्पर फाडले व तुम्हाला माज आला आहे.

असे म्हणुन पीडितेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले व हाताने मारहाण करुन शिविगाळ  दमदाटी केली.तसेच वरिलपैकी पाच ते दहा यांनीही पीडितेचे पती व चुलत सासरे  यांना  हाताने मारहाण करुन शिविगाळ दमदाटी केली असल्याची तक्रार पीडित महिलेने सासवड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. 

सासवड पोलिसांनी आरोपी चंद्रकांत रघुनाथ जगदाळे,स्वप्नील चंद्रकांत जगदाळे,संतोष विठ्ठल जगदाळे,लक्ष्मण दत्तात्रय जगदाळे,दिपक शंकर जगदाळे,प्रशांत सुनिल जगदाळे,अक्षय रामदास जगदाळे,मयुर स्वप्निल जगदाळे,गोरख रघुनाथ जगदाळे,रोषन नवनाथ जगदाळे सर्व रा. गराडे मटवाडी ता पुरंदर या सर्वांवर गुन्हा दाखल केला असून सासवड पोलिस पुढील तपास करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *