पुरंदर
पुरंदर तालुक्यातील धालेवाडी येथे एका 45 वर्षीय महिलेचा घरगुती भांडणाच्या रागातून कोयता आणि दगड मारुन खून करण्यात आल्याची घटना आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी घडली आहे.
याबाबतची फिर्याद पोलिसात देण्यात आली असून पोलिसांनी या संदर्भात भारतीय दंड विधान कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत जेजुरी पोलिसांकडून देण्यात आलेली माहिती अशी की पुरंदर तालुक्यातील धालेवाडी येथील अक्षय विठ्ठल साबळे याने या संदर्भातली तक्रार जेजुरी पोलिसात दिली आआहे त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.03/2/2022 रोजी सकाळी 9/00 वाजता धालेवाडी गावच्या हद्दीत फिर्यादीची आई मयत निर्मला विठ्ठल साबळे हि तिचे शेतजमिनीत काम करीत होतो त्यावेळी तिच्या व आरोपी विशाल माणिक जगताप वय 30 वर्षे रा धालेवाडी ता पुरंदर जि पुणे यांच्यात घरगुती वादाचे कारणावरून वाद झाला .त्यावेळी आरोपीने तिच्या डोक्यात कोयता व दगडाने मारून तिचा खून केला आहे.
यासंदर्भातील अधिक तपास जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर हे करत आहेत.