पुणे जिल्हातील स्तुत्य उपक्रम ; जिल्ह्यातील “या” ग्रामपंचायतीने शासकीय कार्यालयात बसवल्या तक्रार व सुचना पेट्या

पुणे जिल्हातील स्तुत्य उपक्रम ; जिल्ह्यातील “या” ग्रामपंचायतीने शासकीय कार्यालयात बसवल्या तक्रार व सुचना पेट्या

दौंड

ग्रामपंचायत मिरवडी च्या वतीने मिरवडी मेमाणवाडी गावातील मुख्य ठिकाणे म्हणजेच ग्रामपंचायत कार्यालय,शाळा,प्राथमिक आरोग्य उपकेंद्र,मुख्य चौक,पाणीपुरवठा टाकी अश्या महत्वपूर्ण ठिकाणी तक्रार अथवा सूचना पेटी बसविण्यात आलेल्या आहेत.

नागरिकांच्या काही तक्रारी किंवा सूचना आपण प्रत्यक्ष मांडू शकत नसताल तर त्या पेटीत सुवाच्य अक्षरात आपले मत चिठ्ठीद्वारे टाकावे.

आठवड्यात एकदा त्या सूचना तपासून त्यावर ग्रामपंचायत मिरवडी द्वारे योग्य ती कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जाईल असे गावचे सरपंच सागर शेलार यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *