सरस्वती अनाथ आश्रमतर्फे आंबळेतील १२० गरजुंना किराणा किटचे वाटप

सरस्वती अनाथ आश्रमतर्फे आंबळेतील १२० गरजुंना किराणा किटचे वाटप

पुरंदर

सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम दापोडी
यांचेकडून आंबळे गावातील निराधार महिला, अपंग, कष्टकरी मजूर यांना २५०० रुपये किमतीचे १२० किराणा किट संस्थेचे अध्यक्ष सुरवसे सर,साठे सर व गायकवाड सर तसेच गावातील नागरिकांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

महत्वाचे म्हणजे सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम ला कुठलेही शासकीय अनुदान नसताना देणगीदारांच्या देणगीवर ही संस्था चालत असून, या संस्थेतील विद्यार्थी उत्तम प्रकारे घडवले जातात. या संस्थेतील घडवलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये, परदेशात उत्तम प्रकारे नोकरी व्यवसायात आहेत.

आंबळे ग्रामस्थांच्यावतीने सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम दापोडी यांच्या अध्यक्ष संस्थापक व सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

या कार्यक्रमासाठी सरपंच सौ. राजश्री थोरात, उपसरपंच श्री. सचिन दरेकर, सदस्य मधुकर ढोले,विठ्ठल जगताप, राहुल कुंजीर, दिलीप जगताप, यशवंत शेंडगे, मोहन कुंजीर आणि ग्रामस्थ संजय जगताप, रामचंद्र दरेकर ,पांडुरंग जगताप, विठ्ठल कुंजीर व राजेंद्र दरेकर, सामाजिक कार्यकर्ते आबा जगताप,दत्तात्रय जगताप,नंदकुमार जगताप,किशोर दरेकर,अमोल दरेकर,दादा थोरात,राजू जगताप,अशोक थोरात,पप्पू थोरात,किरण गायकवाड,व्यंकटेश गायकवाड, शरद सुतार,संकेत कासवेद, संतोष जगताप,पांडुरंग दरेकर हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *