“तुझ्यासारखा भाऊ प्रत्येक बहिणीला मिळो” !!!!         महिला पोलिस कर्मचार्याने घेतला गळफास               पुणे जिल्ह्यातील घटना

“तुझ्यासारखा भाऊ प्रत्येक बहिणीला मिळो” !!!! महिला पोलिस कर्मचार्याने घेतला गळफास पुणे जिल्ह्यातील घटना

पुणे

मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी दिपाली बापुराव कदम वय 26 रा.देलवडी ता.दौंड. सध्या नोकरी, माणिकपूर, वसई पोलिस स्टेशन ,मुंबई.यांनी आज पहाटे साडे पाचच्या सुमारास देलवडी येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.

मनमिळाऊ, हुशार दिपाली यांच्या अचानक सोडून जाण्याने हळहळ  व्यक्त केली जात आहे.या प्रकरणी फिर्यादी दिपाली यांचा लहान भाऊ रोहित बापुराव कदम देलवडी ता.दौंड.जि.पुणे.यांच्या तक्रारी नुसार  आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी मुंबई पोलिस दलातील पोलिस नाईक वाल्मिक गजानन आहीरे पालघर याच्या वर गुन्हा नोंद झाला आहे .

सदर माहिती प्रमाणे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचारी दिपाली कदम यांचा विवाह 16 नोव्हेंबर रोजी मयुर कांबळे ( भोसरी पुणे)  यांच्या बरोबर होणार होता. आरोपी वाल्मिक आहिरे हा दिपाली यांना वारंवार फोन करून मानसिक त्रास देत होता.पुढे आलेल्या माहिती नुसार आरोपीने दिपाली यांना या आधी मारहाण करत शाररीक मानसिक त्रास दिल्याचे  देखील उघडकीस आले आहे.

तसेच दिपाली यांचे लग्न ठरलेल्या मयूर कांबळे व कुटुंबीयांना देखील फोनवरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न आरोपी करत होता तसेच दिपाली यांच्या घरातील लोकांना देखील फोनवरून जीवे मारेण अशाप्रकारे धमकावण्याचे प्रयत्न देखील आरोपीने केल्याचे उघडकीस आले आहे.

दिपाली यांनी आपल्या लहान भावाला आत्महत्या पुर्वी केलेल्या मोबाईल मेसेज वरील माहिती मध्ये  नराधम वाल्मिक आहिरे कशा प्रकारे त्रास देत होता याचा उल्लेख करत भाऊ रोहित यांना आपली व्यथा मांडत  वाल्मिक आहिरेला सोडू नका त्यानी मला खुप त्रास दिला आहे.तसेच आईवडीलां कडे लक्ष दे तुझ्या सारखा भाऊ प्रत्येक बहिणीला मिळो.असे हृदय पिळवटून टाकणारे एक एक शब्द नमूद केले आहेत.

आज संध्याकाळी दिपाली कदम यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यवत पोलिस स्टेशनला यावेळी या नराधमाला  लवकरात लवकर अटक व्हावी अशी मागणी नातेवाईक करत होते यावेळी यवतचे जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम,विकास शेलार,संदानंद दोरगे व यवत देलवडी परिसरातील ग्रामस्थ नातेवाईक उपस्थितीत होते.

या प्रकरणा मुळे पोलिस दलातील महिला सुद्धा असुरक्षित आहेत का अशी चर्चा सुरू होती. 
पुढील तपास यवत पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *