महात्मा फुले मराठी साहित्य संमेलन २७ नोव्हेंबर रोजी खानवडीत होणार !!! दशऱथ यादव यांची माहिती

महात्मा फुले मराठी साहित्य संमेलन २७ नोव्हेंबर रोजी खानवडीत होणार !!! दशऱथ यादव यांची माहिती

पुरंदर

चौदावे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी (ता. पुरंदर) येथे दि.२७ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार आहे, उद्घाटन समारंभ, कथाकथन, ग्रंथदिंडी, नाट्यप्रयोग, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संमेलनाच्या संयोजन बैठकीला राजाभाऊ जगताप, प्रसिद्धी प्रमुख दत्तानाना भोंगळे, सुनील लोणकर, श्यामकुमार मेमाणे, गंगाराम जाधव, नंदकुमार दिवसे, बहुजन हक्क परिषदेचे सुनील धिवार, दत्ता कड, रवींद्र फुले, दत्ता होले आदी उपस्थित होते.

महात्मा फुले यांच्या मूळ खानवडीमध्ये दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. या संमेलनात राज्यभऱातून लेखक, कवी सहभागी होतात. क-हा नदीच्या काठावर रंगणा-या या साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त गौरव अंक प्रकाशित करण्यात येणार आहे. सुवर्ण महोत्सव समितीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. संमेलनात सहभागी होऊ इच्छिणा-या लेखक,कवींनी मो.९८८१०९८४८१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राजाभाऊ जगताप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *