विजेच्या उपकरणाचा शॉक घेवून आत्महत्या????

विजेच्या उपकरणाचा शॉक घेवून आत्महत्या????

दौंड

दौंड तालुक्यातील यवत येथे एका विवाहित महिलेने सासरच्या जाचास कंटाळून विजेच्या उपकरणाचा शॉक घेवून आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक घडली आहे.याप्रकरणी यवत पोलीसांनी सासु, नवरा, दिर आणि नणंद अशा चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, या विवाहित महिलेच्या आई आणि नातेवाईकांनी मुलीची आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी तिची हत्याकेल्याचा आरोप केला होता.

याप्रकारामुळे यवत पोलीस स्टेशनला काल तणावाचे वातावरण होते.धनश्री अजित करडे ( रा.यवत ता.दौंड,जि.पुणे ) असे आत्महत्या केलेल्या या विवाहीत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शर्मिला राजाराम करडे, अजित राजाराम करडे, सुजित राजाराम करडे (सर्व.रा.यवत,ता.दौंड) तसेच सौ.पूनम कैलास खैरे (रा.खामगाव फाटा, ता.दौंड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *