महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी वनिता कोरटकर

महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी वनिता कोरटकर

सोलापुर

महाराष्ट्र राज्यातील विविध सामाजिक  क्षेत्रात सहभाग नोंदवीत महिलांच्या प्रश्नावर तळमळीने काम करणा-या वजनसेवेचे व्रत्त स्विकारुन अविरतपणे काम करणा-या संयमी वक्तृत्व व सामाजिक प्रश्नांची जाण असणार्या सोलापुरजिल्ह्यातील अकलूज येथील रहीवासी असलेल्या मा. सौ. वनिता कोरटकर मँडम यांच्या नावाची शिफारस असंघटीतमहिला कामगार संघाच्या प्रदेश कार्याध्याक्षा मा. माधुरी उदावंत मँडम तसेच महिला संघाच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्यतथा महाराष्ट्र प्रदेश  संपर्क प्रमुख  मा. शिलाताई डावरे मँडम यांनी केलेल्या शिफारसी नुसार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. एस्. एन्. ठाकूर सर यांच्या मान्यतेने  महिला धनश्री ग्रुपच्या वतीने आयोजित शिलाई मशीन व प्रमाणपत्र वाटपकार्यक्रमात BBMAK संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. संजयजी रणदिवे सर यांनी सदर निवडीची अधिकृत घोषणा केलीया निवडीबद्दल बोलताना रणदिवे सर यांनी सांगितले की वनिता जी कोरटकर यांनी अल्पावधीतच धनश्री महिलासक्षमीकरण विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुख पदाची  धुरा यशस्वीरित्या संभाळत अल्पावधीतच केलेल्या उल्लेखनीयकामाची दखल घेऊन संस्थेच्या निवड कमिटीने ही नियुक्ती करत असल्याचे सांगितले.

मा. वनिता ताई  यांची निवड जाहीर झाले नंतर कौशल्य विकास विकास व व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ  मुंबई बोर्डाचेसचिव तथा नवक्रांती शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष मा. धनंजयजी घुले सर यांचे हस्ते सन्मानपुर्वक नियुक्ती पत्रप्रदान करणेत आले_या प्रसंगी मा संजयजी रणदिवे, उमाताई वाळके अश्विनी रेडे पाटील प्रमिला झौंबाडे, विजयाकर्णवर, उज्ज्वला पवार रोहिणी भोंग प्रताप रणदिवे इ मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सौ वनिता शिंदे कोरटकर यांनी सांगितले मला दिलेल्या संधीबद्दल निवड कमिटीची मी आभारी असून, संस्थेने दिलेली जबाबदारी आणि दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून संस्थेच्या नियमांचे पालन करून सामाजिकबांधिलकी जपत संस्थेच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचविणार आहे मानवता हा एकच धर्मआणि आर्थिक दुर्बल घटक ही एकच जात यांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास हा या संघटनेचा उद्देश असून बेरोजगारलोकांना काम मिळवून देणे, असंघटित कामगारांना आत्मसन्मान मिळवून देणे ,सार्वजनिक ठिकाणी माता-भगिनींना सुरक्षामिळवून देणे, वरिष्ठ नागरिकांसाठी पेन्शन सुरू करणे, अकुशल कामगारांना कौशल्य विकसित करून स्व रोजगाराच्यासंधी उपलब्ध करून देणे ,स्वाभिमानी, आत्मनिर्भर ,शक्तिशाली राष्ट्राची उभारणी करणे इत्यादी संघटनेच्याउद्दिष्टपूर्तीसाठी सदैव प्रयत्नशील असणार आहे.

प्रदेशाध्यक्ष पदी निवडीची अधिकृत घोषणा होताच मा. वनिताजी कोरटकर मँडम यांच्यावर अभिंनदनाचा वर्षाव सुरुझाला तसेच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. एस्. एन्. ठाकुर सर , महासचिव मा. पंडीतजी कांबळे साहेब, महाराष्ट्र विधानभवनाचे माजी प्रधान सचिव तथा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डाँ. अनंतजी कळसे सर, राष्ट्रीय स्टँडींग कमिटीचे चेअरमनतथा धनश्री एज्युकेशन ग्रुपचे मँनेजिंग डायरेक्टर  मा. दिपकजी काळे सर,  महा. प्रकल्प संचालक मा. अजितजी केळकरसर तसेच धनश्री सक्षमिकरण समितीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा मा. सौ. रेखाताई बागुल तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा मा. सौ संगीता साळुंखे मँडम महिला प्रदेश सरचिठणीस मा. गौतमी ओहाळ मँडम,राजश्री चव्हाण ठाणे जिल्हाउपाध्यक्ष,सरीता मदाने विरार विभाग प्रमुख, अर्चना कापडे अमरावती जिल्हा उपाध्यक्ष,यमूना माळी विदर्भ विभाग प्रमुखयांनी तसेच महाराष्ट्र राज्यातील संघटनेच्या सर्व पदाधिकार्यानी  मा.कोरटकर मँडम यांचे अभिनंदन केले व पुढीलवाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शिवरत्न फाउंडेशन व डॉटर्स मॉम फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा माननीय सौ शितल देवी मोहिते-पाटील यांनीअभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *